व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा 'फेमस लवर' चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. मागचं सगळं काही विसरून विजय देवरकोंडा आगामी प्रोजेक्टकडे वळला आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या आगामी चित्रपटात तो झळकणार आहे आणि या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'फायटर'.

'फायटर' चित्रपटात मुख्य भूमिकेत अनन्या दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवायदेखील आणखीन काही भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. 


दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी ट्विट केले की, पैन इंडिया वेंचरमध्ये विजय देवरकोंडा सोबत अनन्या पांडे तुमचे स्वागत करताना मला आनंद होतो आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करायला मजा येणार आहे.


अनन्या पांडे व विजय देवरकोंडा यांनी देखील ट्विट करत एकमेकांना वेलकम केले आहे. अनन्या पहिल्यांदाच विजय देवरकोंडा सोबत काम करताना दिसणार आहे. त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.


अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने स्टुडंट ऑफ द ईयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती पति पत्नी और वो मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते.

तर विजय देवरकोंडाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन रेड्डी चित्रपटामुळे तो खूप लोकप्रिय झाला होता.

या चित्रपटाचा हिंदी रिमेक कबीर सिंग मागील वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ananya Pandey has won the lottery! She will be debut in south industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.