फिटनेसच्या बाबतीच भल्याभल्यांना टक्कर देते ही अभिनेत्री, ओळखा पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:53 PM2021-06-22T14:53:00+5:302021-06-22T14:53:32+5:30

आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अनन्या पांडे फिटनेसवर बरंच लक्ष देते.

Ananya Panday nails aerial Yoga inversion for the first time, read benefits of the exercise inside | फिटनेसच्या बाबतीच भल्याभल्यांना टक्कर देते ही अभिनेत्री, ओळखा पाहू

फिटनेसच्या बाबतीच भल्याभल्यांना टक्कर देते ही अभिनेत्री, ओळखा पाहू

Next

कलाकार मंडळींचं शेड्युअल खूप बिझी असतं. कलाकारांचं शुटिंग तर कधीकधी सकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत चालतं. एरव्ही कलाकारांची स्टाईल, लूक, फॅशन याची प्रचंड चर्चा असायची आता त्यांचा फिटनेस फंडा जाणून घेण्यातही चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. अशा या बिझी शेड्युअलमध्ये कलाकारांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असतं. त्यामुळे काही कलाकार फिट राहण्यासाठी वर्कआऊट करत जिममध्ये घाम गाळतात. तर काही कलाकार विविध योगासनं करतात. 

आता याच यादीत स्टारकिड्सदेखील त्यांच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. फिटनेसबाबत सजग असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अनन्या फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते. त्याचबरोबर ती आपल्या डाएटची देखील खूप काळजी घेते. 

अनन्याचे हे फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. तिचे हा फिटनेस मंत्र कोणीही अगदी सहज आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश करू शकतं.फिटनेसबाबत सजग असलेली अनन्या वर्कआऊट करत घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे शेड्युअल कितीही बिझी असले तरी आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा अनन्याचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. 

Web Title: Ananya Panday nails aerial Yoga inversion for the first time, read benefits of the exercise inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app