ठळक मुद्देसाराची आई म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग इतरी वेगळी दिसत होती की तिला ओळखणे देखील कठीण झाले होते.

सारा अली खान तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असली तरी ती तिच्या कुटुंबियांना वेळ देते. तिला अनेकवेळा तिच्या आई आणि भावासोबत पाहाण्यात येते. ती नुकतीच तिची आई अमृता सिंग आणि इब्राहिमसोबत हॉलिडेसाठी गेली होती आणि आता तिला तिच्या आईसोबत मुंबईत एका मंदिराच्या बाहेर पाहाण्यात आले. पण त्यावेळी साराची आई म्हणजेच अभिनेत्री अमृता सिंग इतरी वेगळी दिसत होती की तिला ओळखणे देखील कठीण झाले होते.

अमृता सिंगला अनेकवेळा सारासोबत पाहाण्यात येते. साराच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील सारा तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. अमृता सिंगने एकेकाळी बॉलिवूड गाजवले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची देखील त्याकाळी चांगलीच चर्चा रंगायची. पण अमृता सिंगचा मंदिराबाहेरचा हा मेकअप शिवाय लूक पाहिल्यास तिला ओळखणे कठीण जात आहे.

सैफ आणि अमृता सिंग यांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या घरातून विरोध होता. सैफ आणि अमृता यांच्यामध्ये अमृता 12 वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याने त्याने तिच्यासोबत लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट 2004 मध्ये झाला आणि 2012 मध्ये सैफने करिनासोबत लग्न केले.

‘बेताब’ हा अमृता सिंगचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर तिने चमेली की शादी, तुफान, राजू बन गया जंटलमंन, आईना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या. ती यावर्षी बदला या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amrita Singh looks unrecognizable in this picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.