लवकर मोठी हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे..; ‘गब्बर’ 14 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:00 AM2021-09-24T08:00:00+5:302021-09-24T08:00:02+5:30

Amjad Khan : ही प्रेमकथा एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही...

amjad khan and his wife shehla khan love story | लवकर मोठी हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे..; ‘गब्बर’ 14 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....!!

लवकर मोठी हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे..; ‘गब्बर’ 14 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....!!

Next
ठळक मुद्देअमजद यांचे 27 जुलै 1992 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अमजद यांना तीन मुले आहेत. पत्नी शेहला मुलांसोबत राहते.

‘शोले’तील गब्बरला कोण विसरू शकेल?  ही भूमिका साकारली होती दिग्गज अभिनेते अमजद खान (Amjad Khan) यांनी. अमजद खान यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. पण आजही प्रेक्षकांना मनात घर करून आहे ती त्यांनी साकारलेली ‘गब्बर’ची भूमिका. ही भूमिका जणू त्यांच्यासाठीच बनली होती. 
पडद्यावर अमजद खान यांनी अनेक निगेटीव्ह भूमिका साकारल्या. मात्र ख-या आयुष्यात ते तितकेच चांगले पती व पिता होते. अमजद खान यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.


 
14 वर्षांच्या शेहलाच्या प्रेमात पडले होते अमजद
शेहला व अमजद खान मुंबईत एकमेकांचे शेजारी होते. त्यावेळी अमजद बीएला होते आणि शेहला केवळ 14 वर्षांची शाळेत जाणारी मुलगी होती. याचदम्यान अमजद शेहलाच्या प्रेमात पडले होते. शेहला यांनी एका मुलाखतीत ही लव्हस्टोरी सांगितले होती.
शेहला व अमजद खान एकमेकांसोबत बॅडमिंटन खेळत. एका खेळता खेळता शेहलाने अमजद यांना भाई म्हटले. यावर, मुझे भाई मत बोलो, असे अमजद शेहलाला म्हणाले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी अमजद यांनी शेहलाला थेट लग्नासाठी प्रपोज केले होते. एकदिवस शेहला शाळेतून परतत असताना अमजद यांनी तिला मध्येच गाठले. तुला शेहलाचा अर्थ ठाऊक आहे, असे त्यांनी तिला विचारले.  शेहला म्हणजे, जिच्या डोळ्यांचा रंग गडद आहे. लवकर मोठी हो. कारण मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे ते तिला म्हणाले.

अमजद शेहलाच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी शेहलाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. मात्र शेहला सध्या खूप लहान आहे, असे म्हणत तिच्या वडिलांनी हा प्रस्ताव नाकारला. यामुळे अमजद प्रचंड संतापले होते. यानंतर शेहलाच्या वडिलांनी तिला पुढच्या शिक्षणासाठी अलीगडला पाठवून दिले. आता शेहला व अमजद खान एकमेकांपासून दुरावले होते. आता केवळ पत्र हेच त्यांच्यातील संवादाचे माध्यम होते. दोघेही एकमेकांना पत्र लिहित. बराच काळ हा सिलसिला सुरू राहिला. अनेक वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये राहिले आणि योग्यवेळ येताच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अमजद खान यांचे आईवडिल पुन्हा एकदा मुलाचे स्थळ घेऊन शेहलाच्या घरी गेले. यावेळी शेहलाचे वडिल लग्नासाठी तयार झाले आणि 1972 साली हे कपल लग्नबंधनात अडकले.
लग्नानंतर वर्षभरात या जोडप्याच्या घरी शादाब हा मुलगा जन्मला. एकीकडे मुलाचा जन्म आणि दुसरीकडे ‘शोले’ची भूमिका असा दुहेरी आनंद अमजद यांच्या वाट्याला आला.  ‘शोले’ रिलीज झाल्यानंतर अमजद यांचे अख्खे आयुष्यच बदलले. 

अमजद यांचे 27 जुलै 1992 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अमजद यांना तीन मुले आहेत. पत्नी शेहला मुलांसोबत राहते. शेहला कधीच पतीचे सिनेमे पाहत नाहीत. त्यांचे सिनेमे मला अमजदची आठवण देतात, म्हणून मी ते पाहणे टाळते, असे शेहला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

Web Title: amjad khan and his wife shehla khan love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app