‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:11 PM2021-05-12T18:11:44+5:302021-05-12T18:16:57+5:30

Don completed 43 Years of release: 1978 साली आजच्याच दिवशी म्हणजे 12 मे रोजी ‘डॉन’ हा सिनेमा रिलीज झाला होता.

amitabh bachchan-zeenat aman film don completed 43 years of release makers and distributors fight for movie name | ‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा

‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘डॉन’ सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. पण हा सिनेमा अनेक सुपरस्टार्सनी नाकारला होता.

अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) , जीनत अमान (Zeenat Aman) , हेलन आणि प्राण स्टारर ‘डॉन’ (Film Don) या चित्रपटाच्या रिलीजला आज  43 वर्षे पूर्ण झालीत. 1978 साली आजच्याच दिवशी म्हणजे 12 मे रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक होते चंद्रा बरोट आणि निर्माते होते नरीमन इराणी. ऐकून आश्चर्य वाटेल पण हा सिनेमा फक्त 7 लाख रूपयांत बनून तयार झाला होता आणि या सिनेमाने बॉक्सआॅफिसवर 7 कोटींची बक्कळ कमाई केली होती. या सिनेमाच्या शीर्षकाबद्दलचा एक मजेदार किस्सा कदाचित तुम्हाला माहित नसेल. आज आम्ही तुम्हाला हाच किस्सा सांगणार आहोत. (Don completed 43 Years of release)
 तर ‘डॉन’ या नावावरून मेकर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स यांच्यात चांगलेच वाजले होते. डिस्ट्रिब्युटर्सला ‘डॉन’ हे नाव नको होते आणि मेकर्स हे नाव बदलायला तयार नव्हते. यामुळे ‘डॉन’नावाने हा सिनेमा रिलीज करायचे म्हटल्यावर मेकर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. खुद्द अमिताभ यांनी काही महिन्यांपूर्वी हा किस्सा शेअर केला होता.

म्हणून नको होते ‘डॉन’ हे नाव
सिनेमाचे ‘डॉन’ हे नाव बदलावे, यासाठी डिस्ट्रीब्युटर्स दबाव टाकत होते. कारण काय तर त्या काळात ‘डॉन’ नावाची अंडरविअर चांगलीच लोकप्रिय झत्तली होती. एका अंडरविअर ब्रँडचे नाव सिनेमाला दिल्यामुळे सिनेमा चालणार नाही, अशी भीती डिस्ट्रिब्युटर्सला होती. त्यांना कुठल्याही स्थितीत तोटा नको होता. पण मेकर्स मानायला तयार नव्हते. अखेर खूप वादानंतर, खूप मतभेदानंतर ‘डॉन’ याच नावाने सिनेमा रिलीज झाला आणि बघता बघता ब्लॉकबस्टर बनला.

खईके पान बनारस वाला...
‘डॉन’ सिनेमातील ‘खईके पान बनारस वाला’ हे गाणे तुफान गाजले. या गाण्याचाही एक किस्सा आहे. हे गाणे आधी सिनेमात नव्हते. ते नंतर जोडले गेले. आधी हे गाणे देव आनंद यांच्या ‘बनारसी बाबू’ या सिनेमासाठी तयार करण्यात आले होते. पण देवआनंद यांनी हे गाणे त्यांच्या सिनेमातून हटवले आणि नंतर ‘डॉन’मध्ये ते समाविष्ट करण्यात आले.

अनेकांनी दिला होता नकार
‘डॉन’ सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. पण हा सिनेमा अनेक सुपरस्टार्सनी नाकारला होता. धर्मेन्द्र, जितेन्द्र व देव आनंद यांना या सिनेमाची स्टोरी ऐकवल्यावर त्यांनी तो करण्यास नकार दिला होता.

Web Title: amitabh bachchan-zeenat aman film don completed 43 years of release makers and distributors fight for movie name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.