ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.

लोक फार लवकर विसरतात, अशी एक सर्वसामान्य भावना असली तरी असे मुळीच नाही. असे असते तर अमिताभ बच्चन  10 वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्वीटमुळे आजही ट्रोल झाले नसते. होय, ऐकून आश्चर्य वाटेल, पण अमिताभ बच्चन यांनी 10 वर्षांपूर्वी अंडरगारमेंटवर एक ट्वीट केले होते. या ट्वीटवरून ते तेव्हाही ट्रोल झाले होते. आज 10 वर्षांनंतरही ते ट्रोल होत आहेत.
अमिताभ सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. अशात अनेकदा ते ट्रोल होतात. सध्याही ते असेच ट्रोल होत आहेत. कोणीतरी त्यांचे 10 वर्ष जुने ट्वीट शोधून ते व्हायरल केले.

आपल्या ट्वीटमध्ये अमिताभ यांनी अंडरगारमेंट्सबद्दल एक प्रश्न विचारला होता. ‘इंग्रजी भाषेत ब्रा एकवचनी आणि पँटीज अनेकवचनी का ?’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी 12 जून 2010 रोजी केले होते. हे ट्वीटरवर त्यांचे 26 वे ट्वीटहोते. त्यावेळी त्यांचे हे ट्वीटपाहून लोक हैराण झाले होते. तेव्हापासून आज 2021 पर्यंत या ट्वीटवरून अमिताभ ट्रोल होत आहेत.  

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.  अयान मुखर्जीच्या सुपरनॅच्युरल थ्रीलर ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये ते दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय आहे.

नागराज मंजुळेसोबतचा त्यांचा ‘झुंड’ हा सिनेमाही तयार आहे.   दिग्दर्शक नाग अश्विनच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री झाली आहे. अजून चित्रपटाचे टायटल ठरलेले नसले तरी या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.  या आगामी सिनेमात प्रभास आणि दीपिका पादुकोण लीड रोलमध्ये आहेत. दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी रुपए इतके मानधन घेतले आहे. तर प्रभासने तब्बल 100 कोटी. प्रभासच्या पाठोपाठ अमिताभ बच्चन या सिनेमातील दुसरे हायएस्ट पेड स्टार बनले आहेत. प्रभासनंतर सर्वाधिक मानधन अमिताभ यांना दिले गेले आहे आणि ही रक्कम दीपिकापेक्षा अधिक आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amitabh Bachchan tweeted 10 years ago on undergarments that trolls are happening till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.