७७ वर्षीय अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी लिवरच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल होते. त्यांनी रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. यादरम्यान अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय होते आणि आपल्या चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबतची अपडेट देत होते. आता बिग बींशी निगडीत वृत्त ऐकल्यानंतर तुम्हाला त्यांची चिंता वाटेल. 


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन लवकरच चित्रपटातून मोठा ब्रेक घेणार आहेत आणि आराम करणार आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी नागराज मंजुळेच्या चित्रपट झुंडचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा सिनेमा या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता काही काळ अमिताभ बच्चन ब्रेक घेणार असून त्यानंतर ते त्यांच्या पुढील प्रोजेक्टवर काम करणार आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, जया बच्चन, अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन यांनी बरेच समजवल्यावर ते ब्रेक घ्यायला तयार झाले. सतत काम केल्यामुळे ते खूप थकले आहेत. याआधीदेखील त्यांना ब्रेक घ्यायला सांगितला होता पण ते ऐकायला तयार नव्हते. 


मागील काही दिवसांपूर्वी अमिताभ कोलकातामध्ये २५ वे कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन करणार होते. पण, तब्येत ठीक नसल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. अमिताभ बच्चन न गेल्यामुळे या फेस्टिव्हलचे उद्घाटन बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने केले.


अमिताभ बच्चन गेली १९ वर्षे सातत्यानं काम करत आहेत. ९०च्या दशकात त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी त्यांच्याकडे काहीच काम नव्हते. याचदरम्यान २००० साली स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती शोचं सूत्रसंचालन करण्याची ऑफर मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जोमाने काम करायला सुरूवात केली. हा शो हिट झाला आणि त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. याच वर्षात प्रदर्शित झालेला चित्रपट 'मोहब्बतें' सुपरहिट झाला. तेव्हापासून आतापर्यंत ते कामामध्ये व्यग्र आहेत.

Web Title: Amitabh Bachchan Take A Break Due To Liver Problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.