amitabh bachchan shares fake picture trolls says please uninstall whatsapp-ram | अमिताभ बच्चन यांनी पुन्हा शेअर केली ‘फेक न्यूज’; युजर्स म्हणाले, कोई इनका फोन ले लो

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा शेअर केली ‘फेक न्यूज’; युजर्स म्हणाले, कोई इनका फोन ले लो

ठळक मुद्देनेटक-यांनी अमिताभ यांना इतक्या वाईट पद्धतीने ट्रोल करण्याचे कारण म्हणजे, 15 दिवसांत अशाप्रकारे तिस-यांदा त्यांनी चुकीची बातमी शेअर केली आहे. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या रविवारी लोकांनी दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावून एकतेचे दर्शन घडवले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी यात सहभाग नोंदवला. महानायक अमिताभ बच्चन हेही या उपक्रमात सहभागी झालेत. पण यानंतर नेटक-यांनी अमिताभ यांना ट्रोल करणे सुरु केले. याचे कारण म्हणजे त्यांनी शेअर केलेला एक चुकीचा फोटो.


होय, त्यांनी जगाच्या नकाशाचा एक फोटो शेअर केला. या फोटोत भारताचा नकाशा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचे दिसतेय. ‘विश्व जग डगमगा रहा था, हिंदुस्तान जगमगा रहा था, आपण सगळे एक आहोत...’, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले होते. मात्र हा फोटो पाहून नेटक-यांनी अमिताभ यांना ट्रोल करणे सुरु केले. 

‘तुम्ही खरं गंभीर आहात की तुमचे ट्विटर अकाऊंट कोणी हॅक केलेय?’ असा सवाल हा फोटो पाहिल्यानंतर एका नेटक-याने अमिताभ यांना केला. ‘हा फोटो फार जुना आहे,’ हे अनेकांनी अमिताभ यांच्या लक्षात आणून दिले. 

केवळ इतकेच नाही तर, ‘कोई फोन ले लो सर के हात से,’ अशा शब्दांत लोकांनी अमिताभ यांना सुनावले. ‘अफवांचे बादशाह आणखी एका व्हाट्सअ‍ॅप फॉर्वर्डसह परत आले आहेत,’ असे एका नेटक-याने त्यांना लक्ष्य करताना लिहिले.

15 दिवसांत तिस-यांदा
नेटक-यांनी अमिताभ यांना इतक्या वाईट पद्धतीने ट्रोल करण्याचे कारण म्हणजे, 15 दिवसांत अशाप्रकारे तिस-यांदा त्यांनी चुकीची बातमी शेअर केली आहे. सर्वप्रथम 23 मार्चला त्यांनी एक ट्विट केले होते. त्यात टाळ्यांच्या आणि शंखनादाच्या कंपनाने कोरोना व्हायरस नष्ट होतो, असा दावा त्यांनी केला होता. पीआयबीने ही पूर्णपणे फेक न्यूज असल्याचे स्पष्ट करत, अशा कुठल्याही उपयाने कोरोना व्हायरस नष्ट होत नसल्याचा खुलासा केला होता. यावरून अमिताभ ट्रोल झाले होते. यानंतर चारच दिवसांनी अमिताभ यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. कोरोना व्हायरस माश्यांमुळे पसरतो, असा दावा या व्हिडीओत केला गेला होता. पण ही सुद्धा फेक न्यूज असल्याचे सिद्ध झाले होते. यानंतर अमिताभ यांनी संबंधित व्हिडीओ डिलीटही केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: amitabh bachchan shares fake picture trolls says please uninstall whatsapp-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.