‘चेहरे’च्या पोस्टरवर एक ‘चेहरा’ मिसींग! चाहते म्हणाले, रिया चक्रवर्ती कुठाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 06:00 PM2021-02-23T18:00:33+5:302021-02-23T18:01:22+5:30

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ‘चेहरे’ या आपल्या आगामी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आणि या पोस्टरवर एक चेहरा ‘गायब’ दिसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

amitabh bachchan shares chehre poster but rhea chakraborty missing in it | ‘चेहरे’च्या पोस्टरवर एक ‘चेहरा’ मिसींग! चाहते म्हणाले, रिया चक्रवर्ती कुठाय?

‘चेहरे’च्या पोस्टरवर एक ‘चेहरा’ मिसींग! चाहते म्हणाले, रिया चक्रवर्ती कुठाय?

Next
ठळक मुद्देसुशांत सिंह राजपूत आणि ड्रग्स प्रकरणामुळे रियाला रिप्लेस तर करण्यात आले नाही ना? की मुद्दाम तिच्या नावाचा वापर टाळला जातोय?  असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.  

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ‘चेहरे’ या आपल्या आगामी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आणि या पोस्टरवर एक चेहरा ‘गायब’ दिसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, सिनेमाच्या पोस्टरमध्ये सगळे चेहरे दिसले पण रिया चक्रवर्तीचा चेहरा गायब दिसला. साहजिकच असे का? असा प्रश्न आता विचारला जातोय. रियाऐवजी या पोस्टरवर क्रिस्टल डिसूजाचा चेहरा दिसतोय. त्यामुळे क्रिस्टलने रियाला रिप्लेस तर केले नाही ना? असा प्रश्नही चाहत्यांना पडलाय.

‘चेहरे’ची घोषणा झाली त्यावेळी या सिनेमाच्या लीड कास्टमध्ये अमिताभ, इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीने अगदी या सिनेमातील तिचा फर्स्ट लूकही शेअर केला होेता. पण पोस्टरमध्ये रिया कुठेही नाही. इमरान हाश्मीने शेअर केलेल्या ‘चेहरे’च्या पोस्टमध्ये सिनेमातील कलाकारांची नाव टॅग करण्यात आली आहेत. पण यात रियाचे नाव मिसींग आहे. रियाच्या चाहत्यांनी लगेच ही गोष्ट नोटीस केली. सोशल मीडियावर लगेच यावरच्या प्रतिक्रिया उमटल्या.

सुशांत सिंह राजपूत आणि ड्रग्स प्रकरणामुळे रियाला रिप्लेस तर करण्यात आले नाही ना? की मुद्दाम तिच्या नावाचा वापर टाळला जातोय?  असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.  

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या  प्रकरणानंतर रिया अचानक चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे, सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची  तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान ड्रग प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली खरी. पण बॉलिवूडमध्ये तिचे कमबॅक होणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. ‘चेहरे’च्या पोस्टरच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: amitabh bachchan shares chehre poster but rhea chakraborty missing in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app