Corona Virus: अमिताभ बच्चन यांची ‘मदत’ कुठाय? ट्रोलर्सच्या प्रश्नाला महानायकाने कवितेतून दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 09:59 AM2020-03-30T09:59:21+5:302020-03-30T10:00:27+5:30

ट्रोलर्सचा प्रश्न, बिग बींचे उत्तर

amitabh bachchan shares beautiful poem on corona donation-ram | Corona Virus: अमिताभ बच्चन यांची ‘मदत’ कुठाय? ट्रोलर्सच्या प्रश्नाला महानायकाने कवितेतून दिले उत्तर

Corona Virus: अमिताभ बच्चन यांची ‘मदत’ कुठाय? ट्रोलर्सच्या प्रश्नाला महानायकाने कवितेतून दिले उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देमाझा स्वभावच कमी बोलण्याचा आहे, असे अमिताभ यांनी या गर्भित कवितेतून सुचवले आहे.

महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. रोज न चुकता चाहत्यांशी संवाद साधणे हा त्यांचा नित्यनेम. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. अशातही अमिताभ चाहत्यांच्या संपर्कात आहेत. कोरोनाबद्दल सतत जनजागृती करत आहेत. पण तरीही अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. याचे कारण म्हणजे, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक उद्योगपती, बॉलिवूड कलाकार, खेळाडू असे सगळे  मदतीसाठी पुढे सरसावले आहेत, मात्र अद्याप अमिताभ यांनी मदत केलली नाही.  अनेकजण मदतीसाठी पुढे येत असताना अमिताभ यांनी मदत का केली नाही? असा प्रश्न ट्रोलर्सनी उपस्थित केला आहे. आता अमिताभ यांनी ट्रोलर्सच्या या प्रश्नाला उत्तर दिले आहे.


होय, अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक इंटरेस्टिंग फोटो शेअर केला आहे. हा अमिताभ यांचा एक जुना फोटो आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कविताही शेअर केली आहे़.  त्यातून त्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीवरून विचारण्यात येणारे प्रश्न आणि चर्चा यांना अप्रत्यक्षणपणे उत्तर दिले आहे.


‘एक ने दिया और कह दिया कि दिया,
दूसरे ने दिया और कहा नहीं  कि दिया, 
दूसरी श्रेणी में ही रहने दो मुझे ऐ प्रीयजन ,
जिसे मिला, वो क्या जाने किसने दिया; 
जानो उसका बस करुण क्रंदन ।

इन हालातों में और क्या कहा जाए ,
जो जानें मुझे , जानें , 
मैं तो सदा स्वभाव से ही रहा हूँ कमसुखन ! 
( कमसुखन : कम बोलने वाला )  

अशी कविता अमिताभ यांनी केली आहे. या कवितेचा अर्थ स्पष्ट आहे. 

 काही लोक मदत करतात आणि त्याचा गाजावाजा करतात. तर काही लोक मदत करतात पण त्याद्दल बोलणे टाळतात. मला त्या दुस-या प्रकारात रहायचे आहे आणि त्यातच राहु द्या. ज्यांना मदत मिळते त्यांना माहिती नसते त्यांना कोणी मदत केलीय. फक्त त्या लोकांचे दु:ख समजून घ्या. या परिस्थितीत काय सांगायचे. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे. माझा स्वभावच कमी बोलण्याचा आहे, असे अमिताभ यांनी या गर्भित कवितेतून सुचवले आहे.
ही कविता त्यांना ट्रोल करणा-यांना खरमरीत उत्तर आहे, असे म्हणतात येईल.

 

Web Title: amitabh bachchan shares beautiful poem on corona donation-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.