Amitabh Bachchan shared video of girl taking treatment from dentist video viral on internet | VIDEO : डेंटिस्टला दात दाखवत होती महिला, अचानक वाजली अशी रिंगटोन की बिग बी हसून हसून झाले बेजार...

VIDEO : डेंटिस्टला दात दाखवत होती महिला, अचानक वाजली अशी रिंगटोन की बिग बी हसून हसून झाले बेजार...

बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन हे सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती'ला होस्ट करत आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही भरपूर अॅक्टिव राहतात. अमिताभ हे त्यांच्या ट्विटरवर नेहमीच व्हायरल व्हिडीओ शेअर करत असतात. असाच एक व्हायरल व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केलाय. यात एक महिला डेंटिस्टकडे आपल्या दातांवर उपचार घेत असते. पण अचानक महिलेचा फोन वाजतो.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिलेने आपल्या फोनवर अशी रिंगटोन लावली आहे जी वाजताच डेंटिस्ट घाबरून खाली पडतो. डॉक्टर आणि महिलेचा हा मजेदार व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केलाय आणि त्यांनाही भरपूर  हसू आल्याचं दिसतं. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंटही करत आहेत.

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर अमिताभ बच्चन यांनी नुकताच दीपिका पदुकोण आणि प्रभाससोबत नाग अश्वीनचा एक सिनेमा साइन केलाय. ते अखेरचे 'गुलाबो सीताबो' मध्ये दिसले होते. आता ते अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्रमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तसेच चेहरे सिनेमात ते इमरान हाश्मीसोबत दिसतील. त्यासोबतच ते नागराज मंजुळे यांच्या 'झुंड'सिनेमातही दिसतील.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amitabh Bachchan shared video of girl taking treatment from dentist video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.