amitabh bachchan covid 19 positive celebs wish to fast recovery | लवकर बरे व्हा...! अमिताभ बच्चन यांच्यासाठी सेलिब्रिटींची प्रार्थना

लवकर बरे व्हा...! अमिताभ बच्चन यांच्यासाठी सेलिब्रिटींची प्रार्थना

ठळक मुद्देसंपूर्ण जग तुमच्यावर प्रेम करते. लवकर बरे व्हा,अशा शब्दांत गायक कैलाश खेर यांनी अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना केली. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन बच्चन यांना करोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि बी-टाऊनमध्ये एकच खळबळ उडाली. पाठोपाठ अमिताभ  लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सुरु झाली. राजकीय नेत्यांपासून तर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह अनेकांनी अमिताभ लवकर बरे व्हावेत, अशी कामना करत सोशल मीडियावर टिष्ट्वट केलेत. ट्विटरवर क्षणात  #AmitabhBachchan आणि #AbhishekBachchan हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आलेत. अभिनेते अनुपम खेर, तापसी पन्नू,   सोनम कपूर अशा अनेकांनी अमिताभ व अभिषेक लवकरच बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. बॉलिवूडप्रमाणेच मामूटी, महेश बाबू या दाक्षिणात्य कलाकारांनीही बिग बी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे
 
आमची प्रार्थना तुमच्यासोबत आहे...

 आदरणीय अमिताभ बच्चन जी!!! तुम्ही जीवनात प्रत्येक कठीण प्रसंगावर तुमच्या धैर्याने मात केली आहे. त्यामुळे तुम्ही करोनाविरुद्धची लढाईदेखील जिंकाल, असा विश्वास माझ्यासकट संपूर्ण देशाला आहे. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत, असे ट्विट अनुपम खेर यांनी केले.

तुम्ही असे किती व्हायरस झेलले, कित्येकांना प्रेरणा दिली. तुम्ही परमेश्वराचे ओजस्वी रूप आहात. असंख्य प्रार्थनांमध्ये तुम्ही आहात. संपूर्ण जग तुमच्यावर प्रेम करते. लवकर बरे व्हा,अशा शब्दांत गायक कैलाश खेर यांनी अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना केली. 
 

 तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी देशातील सगळी जनता देवाकडे प्रार्थना करत आहे. शक्ती आणि धैर्य यांचे दुसरे नाव म्हणजे तुम्ही आहात, असे भूमि पेडणेकर म्हणाली.

 तुम्ही एक लढवय्ये आहात लवकर बरे व्हा, असे ट्विट बोमण इराणी यांनी केले.

तुम्ही लवकर बरे व्हा यासाठी प्रार्थना करतोय. खूप प्रेम आणि प्रार्थना, असे ट्विट अक्षय कुमारने केले.

गेट वेल सून अमित अंकल... असे सोनम कपूरने लिहिले.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: amitabh bachchan covid 19 positive celebs wish to fast recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.