ठळक मुद्देमाधवी स्वामी रामा या धार्मिक गुरूंना मानत होती. त्यांनीच त्यांची ओळख राल्फ शर्मा यांच्यासोबत करून दिली. त्यांच्याच आशीर्वादाने माधवी आणि राल्फ यांनी 14 फेब्रुवारी 1996 ला लग्न केले.

आजपर्यंत अनेक कलाकार काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमधून गायब झाले आहेत. यामध्ये माधवी या एका अभिनेत्रीचा देखील समावेश होतो. माधवीने तिच्या करियरची सुरुवात दाक्षिणात्य सिनेमांपासून केली होती. तिच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. तिने एक दुजे के लिये, अग्निपथ, अंधा कानून, स्वर्ग यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 

माधवीचा जन्म हैद्राबादमध्ये 14 सप्टेंबर 1962 ला झाला. तिने खूपच कमी वयात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली. ती अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असून ती आता परदेशात राहात आहे. माधवी तिचे पती आणि तिच्या तीन मुलींसोबत प्रचंड खूश असून ती तिचा वेळ कुटुंबियांसोबतच घालवते.

माधवीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी गिरफ्तार या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले धूप में निकला ना करो रूप की रानी हे गाणे चांगलेच गाजले होते.

माधवी स्वामी रामा या धार्मिक गुरूंना मानत होती. त्यांनीच त्यांची ओळख राल्फ शर्मा यांच्यासोबत करून दिली. त्यांच्याच आशीर्वादाने माधवी आणि राल्फ यांनी 14 फेब्रुवारी 1996 ला लग्न केले. आता ती न्यू जर्सीमध्ये राहात असून तिचे पती प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. त्यांचा फार्मास्यूटिकलचा मोठा व्यवसाय असून प्रिस्सिल्ला, टिफनी आणि इवेलीन अशी तिच्या तीन मुलींची नावे आहेत. ती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. 


 

Web Title: amitabh bachchan co star Madhavi is away from Bollywood and living in New Jersey now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.