amitabh bachchan apologies tweet to fans for not coming out on sunday meet | रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमिताभ बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमिताभ बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी

ठळक मुद्देसध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिझी आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि काल रविवारी अमिताभ यांनी सर्व चाहत्यांची हात जोडून माफी मागितली. 
होय, दर रविवारी अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची रीघ लागते. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते गर्दी करतात. अमिताभ बच्चन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमीने आधीच चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. अशात त्यांना  डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी व त्यांची एक झलक पाहण्यासाठी काल रविवारी चाहत्यांनी ‘जलसा’बाहेर एकच गर्दी केली. मात्र यावेळी प्रकृती कारणास्तव अमिताभ या चाहत्यांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे बिग बींनी  ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली.
‘माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे. पण चाहते या रविवारीसुद्धा मला भेटायला आले. त्यांना भेटण्यासाठी मी बाहेर येऊ शकलो नाही यासाठी मी त्यांची माफी मागतो,’ अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली. सोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला. या फोटोत ‘जलसा’ बाहेर लोकांची गर्दी दिसतेय.
अमिताभ यांच्या या पोस्टवर लोकांनी असंख्य प्रतिक्रिया देत, त्यांच्या स्वास्थ्याची कामना केली आहे.
गत १६ ऑक्टोबरला पहाटे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना ताबडतोब नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात नियमित आरोग्य तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले गेले होते. सध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिझी आहेत.  या शोच्या काही एपिसोड्सची शूटिंग आधीच करुन ठेवल्याने बिग बी काही दिवस विश्रांती करणार आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते शूटिंग पुन्हा सुरु करणार आहेत.


Web Title: amitabh bachchan apologies tweet to fans for not coming out on sunday meet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.