बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन खऱ्या जीवनातही शहेनशाह असून त्यासारखेच जीवन जगतात. अमिताभ बच्चन ज्या घरात राहतात, तिथे सर्व लक्झरी गोष्टी उपलब्ध आहेत. हे घर स्वतः अमिताभ बच्चन यांनी त्यांना हवं तसं डिझाईन केलं आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला आतून कसा आहे, हे फोटोतून पाहूयात.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव जलसा आहे आणि त्यांचे हे घर विलेपार्ले येथील जुहू येथे आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी ते १२० कोटी रुपये इतकी आहे. 


नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्यांच्या घरावर भारताचा झेंडा फडकताना पहायला मिळाला. 


अमिताभ बच्चन यांच्या घरात त्यांची वेगळी खोली असून भितींवर काही फोटो व स्मृती पहायला मिळत आहेत. 


असं सांगितलं जातं की अमिताभ बच्चन ज्या घरात राहतात तिथे बरेच महागडे इंटेरियर सामान वापरले गेले आहे.


जलसामध्ये अमिताभ बच्चन यांनी वेगळे मंदिर देखील बनवले आहे जिथे काही देवांच्या मूर्ती आहेत.


कधी कधी बिग बी त्यांच्या घरातून चाहत्यांना अभिवादन करतात. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप गर्दी करतात. 


जलसामध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजे जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व नात आराध्यासोबत राहतात. 


बिग बींना हिरवळ खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर एक छोटंसं गार्डनदेखील आहे.


Web Title: Amitabh Bachchan And Jaya Bachchan's 100 Crore Worth Home, Jalsa Exudes Royalty, Take An Inside Tour
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.