ठळक मुद्देऐनाबेलने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचे अनेक बिकनीतील फोटो पोस्ट केले असून तिच्या फोटोंना नेहमीच तिच्या चाहत्यांकडून पसंती मिळते. 

सुलतान फेम अमित संध सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ऐनाबेल दासिल्वा या मॉडेलला तो गेल्या वर्षभरापासून डेट करत होता. त्या दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा सध्या रंगली होती. हे दोघे नेहमीच त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असत. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचे ब्रेकअप झाले असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. त्या दोघांनी या बातम्यांवर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता यावर अमितने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अमितने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी सिंगल असल्याच्या बातम्या खऱ्या असून माझ्या नव्या आयुष्याला मी सुरुवात केली आहे. अमित आणि ऐनाबेल दोघेही त्यांच्या नात्याबाबत सिरियस होते. पण तरीही आपण एकमेकांसाठी परफेक्ट नाही आहोत असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले असे म्हटले जाते. त्यांनी २०१८ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. ऐनाबेल ही ब्राझिलियन मॉडेल असून ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे अनेक हॉट अँड सेक्सी फोटो पाहायला मिळतात. 

ऐनाबेलने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचे अनेक बिकनीतील फोटो पोस्ट केले असून तिच्या फोटोंना नेहमीच तिच्या चाहत्यांकडून पसंती मिळते. 

अमित आणि ऐनाबेल दोघे नैंनिताल, मनाली, लंडन अशा विविध ठिकाणी फिरायला गेले होते. या ट्रीपचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता अमितने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून हे सगळे फोटो डीलिट केले आहेत. 

अमिताने क्यों होता है प्यार या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याची पहिलीच मालिका चांगलीच गाजली होती. त्याने काय पो छे या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याने गोल्ड, सुलतान यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. ऐनाबेलसोबत नात्यात असण्याआधी त्याचे अनेक वर्षं अभिनेत्री नीरू बाजवासोबत अफेअर होते. 

Web Title: amit sadh's Ex girlfriend Annabel DaSilva's hot pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.