‘कहो ना प्यार है’ या २००० मध्ये आलेल्या सुपरडुपर हिट सिनेमा देणारी अभिनेत्री अमिषा पटेलने पहिल्याच चित्रपटाने तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली. पुढच्याच वर्षी ‘गदर एक प्रेमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला.

हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. मात्र या सिनेमानंतर आमिषाला फारसे यश मिळाले नाही.

अमिषाच्या बॉलिवूड प्रवासासोबत आम्ही तुम्हाला तिच्या घराचे फोटो दाखवणार आहोत. अमिषा मुंबईतल्या एक पॉश परिरसरात राहते. अमिषा घरातले फोटो सोशल मीडियावर नेहमीचे शेअर करत असते. अमिषा एका पेंट हॉऊसमध्ये राहते. तिचे घरं खूूप मोठे आणि आलिशान आहे. 

तिच्या घरात खूप सुंदर जिने आहेत. जिन्याला लागून असलेल्या भिंती अमिषाच्या सुंदर फोटो आणि चित्रांनी सजवलेली आहे. ही अमिषाची घरातील सगळ्यात आवडती जागा आहे असे दिसते. कारण रोज ती या जिन्यावर बसून फोटो काढत असते.


अमिषाकडे जवळपास ३५ दशलक्ष डॉलरहून अधिक संपत्ती आहे. बिग बॉस आणि ‘तौबा तेरा जलवा’ हे चित्रपट सोडले तर अमिषा कोणत्या जाहिरातीमध्ये देखील झळकलेली नाहीये. पण असे असले तरी तिच्याकडे चांगलाच पैसा आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amisha patel's house inside photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.