अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंग करतो आहे. आमिर खान हिमाचल प्रदेशमध्ये शूटिंग करतोय. हिमाचलमधल्या छोट्या शहरात रामपपरमध्ये या सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा'चा नवा लूकसमोर आला आहे. हा त्याच्या फॅन क्लबने शेअर केला आहे.   


आमिर खान या फोटोजमध्ये शूटिंग करताना दिसतोय. यात आमिर मोठे केस, दाढीमध्ये दिसतोय. या लूकमध्ये आमिर खानला ओखणं ही कठीण झाले आहे. हिमाचलच्या आधी आमिर खान कोलकत्यात शूटिंग करत होता. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.


लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूरसुद्धा दिसणार आहेत. करीना कपूरचा या चित्रपटातील फोटो लीक झाला आहे त्यात ती देसी लूकमध्ये दिसते आहे. करीना कपूरने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे.

Web Title: Amir khan new look from laal singh chaddha pictures viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.