आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे आमिरने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने काम करतो. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. आमिर खान आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अॅक्टर्स पैकी एक आहे. कारण फक्त उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आमिर खान 11 कोटी रू. इतके मानधन घेतो. तर आमिर खान एखादी फिल्म साईन करताना मानधनापेक्षा प्रॉफिट शेअरिंगला प्राधान्य देतो. आमिर खानचा एखाद्या फिल्मच्या प्रॉफिटमध्ये 70 टक्के हिस्सा घेतो. त्यामुळेच तर आमिर आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या स्टार्सच्या पंक्तित बसला आहे. 


विशेष म्हणजे प्रॉपर्टीच्या बाबतीत  अमेरिकेतील बेवर्ली हिल्समध्येही त्याचा आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 75 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबईत फ्रीडा अपार्टमेंटमध्ये 65 कोटींचे घर आहे. यासोबतच आमिरकडे अनेक लक्झरी कार आहेत. ब्रॅड एंडोर्समेंटमध्येही आमिर मोठी कमाई करतो. 

आमिर याचा पाचगणी या हील स्टेशनवर जवळपास 15 कोटी रुपयांचा बंगला आहे. 2 एकर जागेत हा बंगला बांधण्यात आला आहे. आमिर खान आपली फॅमिली आणि मित्रांसोबत कायम पाचगणीत क्वालिटी टाईम एन्जॉय करण्यासाठी तेथे  जातात. उत्तर प्रदेशातील हरदोईपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले शाहाबादमध्ये अख्तियारपूर हे आमिरचे वडिलोपार्जित गाव आहे.

येथे 125 बिघे जमीन आहे. अख्तियारपूरमध्ये आमिर खानचे एकून 22 घरे आहेत. या घरांची किंमत जवळपास 30 कोटी रुपये इतकी आहे. एकुणच काय तर कमाईच्या बाबतीत आमिर खानने सलमान आणि शाहरूखच्यालाही मागे टाकल्याचे बोलले जाते.

Web Title: Amir Khan has 150 crores lavish bunglow, Also owns 22 flat & farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.