Alka yagnik had revealed she was attracted towards other men while living away from her husband | ...तेव्हा मी परपुरुषाकडे आकर्षित झाली होती;अलका याज्ञिकनं शेअर केला 'तो' प्रसंग

...तेव्हा मी परपुरुषाकडे आकर्षित झाली होती;अलका याज्ञिकनं शेअर केला 'तो' प्रसंग

अलका याज्ञिक यांनी आपल्या सुमुधर आवाजाने सगळ्यांचा आपले चाहते बनवले आहे. कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. अलका यांनी 1989 साली नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केले. मात्र गेल्या 26 पेक्षा अधिक वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. अलका अनेक वर्षांपासून पती नीरज कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. पण वेगळे राहूनदेखील त्यांचे नाते आणि प्रेम टिकून आहे. दोघांची एक मुलगी असून सायशा तिचे नाव आहे. 

 नीरज एक बिझनेसमॅन आहेत.. लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अलका याज्ञिक यांनी हे मान्य केले होते की, पतीपासून लांब राहिल्यामुळे त्या अनेकवेळा परपुरुषांकडे आकर्षित झाल्या होत्या. मात्र त्यांनी कधीही सीमा ओलांडली नाही. कारण काहीही असो, परंतु जेव्हा जोडीदारास दीर्घकाळ एकटेपणा जाणवतो, म्हणून तो व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतो, जिथे त्याच्या भावनांना कोणीतरी समजून घेणारे भेटते.   

अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँग जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा ‘सिलसिला’ चालला. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. अखेर अलका यांनीच पतीला शिलाँगमध्ये परतून आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा ‘लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप’ दोघांच्याही वाट्याला आले. तेव्हापासून नीरज व अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alka yagnik had revealed she was attracted towards other men while living away from her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.