बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची पाळीव मांजर शीबाचे आज निधन जाले आहे. तिला नेहमीच मांजरीसोबत वेळ व्यतित करायला आवडते आणि ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटो शेअर करायची. आलियाने शीबासोबतचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट लिहिली आहे. आलियाशिवाय तिची आई सोनी राजदानने शीबाच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. आलियाला मांजरींची खूप आवड आहे आणि याबद्दल ती नेहमी चाहत्यांना सांगत असते.


आलियाने इंस्टाग्रामवर शीबासोबतचे फोटो शेअर करत म्हटले ती, गुड बाय माझी परी. यासोबतच तिने हार्ट इमोजी वापरली आहे. या फोटोत आलियाने शीबाला खूप प्रेमाने पकडले आहे. 


तर आलिया भटची आई सोनी राजदानने देखील शीबाचा फोटो शेअर करत लिहिले की, RIP शीबा. आम्ही तुझे नाव राणी शीबाच्या नावावरून ठेवले होते. कारण पहिल्या दिवसापासून तुझ्याकडे तशीच रिगल एअर होती. माझी सकाळ पुन्हा कधीच अशी होणार नाही. शीबल्ससोबत तू मला खूप प्रेम दिले. त्यासाठी धन्यवाद.


आलिया भटला मांजरी खूप आवडतात आणि सोशल मीडियावर बऱ्याचदा तिचे मांजरीसोबतचे फोटो पहायला मिळतात. नुकतेच रणबीर कपूर, आलिया भट त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत नीतू, रिद्धीमा, सोनी राजदान, शाहीनसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रणथंभौरला गेले होते.


आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, मौनी रॉय आणि डिंपल राजदिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia Bhatt's Sheeba took leave of the world, the actress shared an emotional post by sharing photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.