सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर वंशवाद हा मुद्दा बॉलिवूडमध्ये इतका पेटलाय की, आता त्याची झळ बॉलिवूड माफियांना सोसावी लागत आहे. थोडक्यात काय तर, वंशवादाचा मुद्दा करण जोहरच्या चांगलाच अंगलट आलेला दिसतोय. आता झाले असे की, करण जोहरच्या एका चित्रपटातून आलिया भटने माघार घेतल्याचे समजतेय. तो चित्रपट कोणता? तिने माघार का घेतली? हेच आता आम्ही तुम्हाला सांगतोय..

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट ही वंशवादाच्या मुद्यामुळे चांगलीच अडकलेली दिसतेय. त्याचे झाले असे की, करण जोहरच्या ‘अरूणिमा सिन्हा’ च्या बायोपिकमध्ये आलिया काम करणार होती. मात्र तिने तिचे नाव मागे घेतल्याची बातमी आहे. लॉकडाऊनमुळे प्रोजेक्ट सुरू व्हायला उशीर होतोय? किंवा वंशवादाच्या मुद्यामुळे करण जोहरच्या चित्रपटात तिला काम करायचे नाहीये, म्हणून तिने या चित्रपटातून माघार घेतली का? याचे कारण तिने सांगितले नाही. या बाबींमुळे आलिया ट्रोल होताना दिसतेय. 

अरूणिमा सिन्हा या पर्वतारोहण करणाऱ्या  अतिशय पराक्रमी महिलेच्या आयुष्यावर आधारित हा बायोपिक चित्रपट आहे. अरूणिमा यांना एक पाय नसून देखील त्यांनी अतिशय जिद्दीने पर्वतारोहण करून तिथे आपल्या नावाचा झेंडा रोवला. त्यांनी आलियाने या चित्रपटात काम करावे म्हणून करण जोहरकडे नाव सुचवले होते. मीडिया रिपोर्टसनुसार, आलियाने या चित्रपटातून तिचे नाव काढून घेतल्याचे समजतेय. आता करण जोहरने या भूमिकेसाठी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांची नावे पुढे केली आहेत. खरंतर अरूणिमा यांनी करण जोहरकडे केवळ दोनच नावे सांगितली होती. एक म्हणजे आलिया तर दुसरे कंगना राणौत. या दोघींशिवाय ती दुसऱ्या  कुणालाही ती बायोपिकमध्ये काम करण्याची परवानगी देऊ इच्छित नाही. बघूया, तर या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागतेय ते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia Bhatt withdraws from Karan Johar's Movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.