बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट हिने इंस्टाग्रामवर नुकतेच व्हाईट रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ती या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. मात्र या लूकसोबत लक्ष वेधून घेतलेला ब्लेझर ड्रेस खूप महाग आहे.


आलिया मिनी व्हाईट ब्लेझरमध्ये आलिया खूपच स्टनिंग दिसते आहे. आलियाच्या या लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, आलियाने परिधान केलेला व्हाईट ब्लेझर ड्रेसची किंमत ८०,७६४ रुपये आहे. हा ड्रेस रेट्रोफिट ब्रॅण्डचा आहे. 


२६ वर्षीय आलियाने या व्हाईट ब्लेझर ड्रेसवर लाईट मेकअप केला आहे. हायलायटेड चीक, न्यूड लिपस्टिप व लाईट आय मेकअपमुळे ती खूपच सुंदर दिसते आहे. आलियाचा हा लूक तिची होणारी सासू म्हणजेच रणबीर कपूर आई व अभिनेत्री नीतू कपूरला देखील खूप आवडला आहे. त्यांनी या फोटोवर कमेंट केली आहे.


आलिया भट लवकरच 'सडक 2' या चित्रपटात दिसणार आहे.

यात आलियाशिवाय आदित्य राय कपूर, पूजा भट, संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.


गेल्या काही दिवसांपासून आलिया भट तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे मानले जात आहे. चर्चा खरी मानाल तर, या लग्नात डिझायनर सब्यासाची मुखर्जी दोघांचे ड्रेस डिझाइन करणार आहेत.शेफ ऋतु डालमियाला केटरिंग अरेंजमेंटसाठी अप्रोच करण्यात आले आहे. या कपलच्या लग्नाची चाहते मात्र मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. तूर्तास आलिया व रणबीरच्या लग्नाची कुठलीही आॅफफिशिअल घोषणा झालेली नाही. लवकर आलिया व रणबीर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत. 

Web Title: Alia Bhatt Wear Lamb Leather White Mini Blazer Dress Worth 80 Thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.