alia bhatt was seen quite irritated and uncomfortable after father mahesh bhatt loses his cool at shaheen bhatt book launch | OMG!  प्रचंड संतापले महेश भट, आलियाने कसेबसे केले शांत! पाहा व्हिडीओ
OMG!  प्रचंड संतापले महेश भट, आलियाने कसेबसे केले शांत! पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देशाहिन एकेकाळी डिप्रेशनमध्ये होती. पण आता ती यातून बाहेर पडली आहे.

मीडियाशी बोलताना अनेकदा स्टार्सचा पारा चढतो. काही स्टार्स संयमाने स्थिती हाताळतात तर काही स्टार्सचा मात्र संयम सुटतो. असेच काही घडले ते दिग्दर्शक महेश भट यांच्याबद्दल. होय, महेश भट यांना संताप इतका अनावर झाला की, ते जोरजोरात ओरडू लागले. त्यांचा तो अँग्री अवतार बघून बाजूला बसलेली आलिया काहीशी अवघडली. पापाला शांत करण्याचे प्रयत्न करताना दिसली. आधी तर महेश भट यांनी आलियाकडे दुर्लक्ष केले. पण नंतर परिस्थिती ओळखून अखेर ते त्यांनी स्वत:ला आवरले.
  आलियाची बहीण आणि महेश भट यांची मोठी मुलगी शाहीन भट हिच्या ‘ I’ve Never been (Un)Happier’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ही घटना घडली. या पुस्तक प्रकाशनाला अख्खे भट कुटुंब एका मंचावर दिसले.

महेश भट, त्यांची पत्नी सोनी राजदान, मुलगी पूजा भट, आलिया भट आणि शाहिन असे सगळे मंचावर होते. सर्वांनी डिप्रेशन आणि मेंटल हेल्थवर बोलणे सुरु केले. याचदरम्यान एका रिपोर्टरने महेश भट यांना एक प्रश्न केला. हा प्रश्न ऐकताच महेश भट संतापले. इतके की,जोरजोरात ओरडू लागले. त्यांचा तो अवतार बघून सगळेच अवाक् झालेत. यादरम्यान आलिया ‘पापा... पापा...’ असे म्हणत महेश भट यांना शांत करताना दिसली. केवळ इतकेच नाही तर, ‘असे होणार, मी तुम्हाला आधीच सावध केले होते,’ असे आलिया मीडियाला उद्देशून म्हणताना दिसली.


हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. विरल भयानी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
शाहिनचे हे पुस्तक तिचे डिप्रेशन  व या आजाराशी तिने दिलेल्या लढ्याबद्दल आहे. शाहिन एकेकाळी डिप्रेशनमध्ये होती. पण आता ती यातून बाहेर पडली आहे.

Web Title: alia bhatt was seen quite irritated and uncomfortable after father mahesh bhatt loses his cool at shaheen bhatt book launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.