Alia bhatt upcoming gangubai kathiawadi movie teaser release | गंगूबाई काठियावाडीचा दमदार टीझर रिलीज, आलिया भटचा नवा अवतार पाहून चाहते झाले अवाक्

गंगूबाई काठियावाडीचा दमदार टीझर रिलीज, आलिया भटचा नवा अवतार पाहून चाहते झाले अवाक्

 संजय लीला भन्साळी यांचा मच अवेटेड गंगूबाई काठियावाडी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. भन्साळीच्या वाढदिवशी टीझर रिलीज करण्यात आला असून आलिया एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हा चित्रपट किती दमदार असेल याची झलक टीझरमधून दिसतेय. 

'कहते हैं कि कमाठीपुरा में कभी अमावस्या की रात नहीं होती क्योंकि वहां गंगू रहती है...' टीझरच्या सुरुवातीलाच हा डायलॉग ऐकून अंगावर काटे उभे राहतात. आलिया भटने गंगूबाई काठियावाडीच्या भूमिकेत जीव ओतला आहे. तिचे डायलॉगही कमाल आहेत. 

 

कोण होती गंगूबाई काठियावाडी?
माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातच्या काठियावाडमध्ये राहणारी होती. त्यामुळे तिला काठियावाडी म्हटले जात असे. लहान वयात गंगूबाईला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. कुख्यात गुन्हेगार गंगूबाईकडे येत. मुंबईच्या कमाठीपुरा भागात गंगूबाई ‘कोठा’ चालवायची. या गंगूबाईने सेक्सवर्करच्या मुलांसाठी प्रचंड मोठे काम केले.

आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आलिया भट व्यतिरिक्त यात विजय राज, हुमा कुरेशी, शंतनु माहेश्वरी आणि सीमा पहावा  दिसणार आहेत. हा सिनेमा 30 जुलै 2021 ला रिलीज होणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia bhatt upcoming gangubai kathiawadi movie teaser release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.