‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री आलिया भट्ट हिला लाँच केले. तिच्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर तिने विविध चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळया भूमिका साकारल्या. ‘हायवे’,‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’,‘कलंक’ यासारख्या अनेक चित्रपटातून तिने तिचे कौशल्य सिद्ध केले. राजस्थान पत्रिकाच्या माहितीनुसार आलियाला हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. यासाठी तिने तयारीसुद्धा सुरु केली आहे.

काही दिवसांपूर्वीच आलियाला तिची बेस्टफ्रेंड आकांशा रंजन कपूरसोबत लॉस एंजेलिसमध्ये पाहण्यात आले. फॅन्सना वाटेल आलिया तिकडे व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. मात्र रिपोर्टनुसार आलिया इंटरनॅशनल सेलिब्रेटी एजेंटच्या शोधात तिकडे गेली होती.  याआधी ऐश्वर्या राय, बिपाशा बासूने आणि प्रियंका चोप्रानेसुद्धा एजेंट नियुक्त केले आहेत. एजेंट्स त्यांना हॉलिवूडमध्ये होत असलेल्या इव्हेंट आणि सिनेमांबाबत माहिती देतात. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, आलियाने नुकतीच 'सडक 2' चे शूटिंग केले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस ती संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 


काही दिवसांपासून आलिया-रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाले होती. मीडिया रिपोर्टनुसार दोघे फ्रांसमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यात किती तथ्य आहे हे आपल्या लवकरच कळेल.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia bhatt turns to hollywood after priyanka chopra deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.