Alia bhatt ranbir kapoor wedding france | आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान

आलिया-रणबीरचे वऱ्हाड निघाले फ्रान्सला, असा आहे त्यांचा वेडिंग प्लान

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या लग्नाची  खोटी पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र बॉलिवूड बबलच्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर फ्रान्समध्ये लग्न करणार आहेत. दोन आठवड्यात दोघांचे लग्न होणार आहे.

रिपोर्टनुसार आलिया-रणबीर नोव्हेंबर महिन्यातच लग्न करणार आहेत. सब्यसाची मुखर्जी दोघांचे ड्रेस डिझायन करणार आहेत.   शेफ ऋतु डालमियाला केटरिंग अरेंजमेंटसाठी अप्रोच करण्यात आले. आता या सगळ्यात किती तथ्य आहे हे येणारी वेळेच सांगेल. या कपलचे फॅन्स त्यांच्या लग्नाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. सध्या आलिया आणि रणबीर लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय. दोघांची लंडनमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकर आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia bhatt ranbir kapoor wedding france

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.