Alia bhatt mutes comments after got trolled on sadak 2 poster | #BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय

#BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा वाद पुन्हा जोर धरू लागला. सुशांतच्या निधनानंतर फक्त चाहतेच नाही तर कलाकारदेखील इंडस्ट्रीतील राजनीतीबद्दल बोलू लागले. नेपोटिझमच्या मुद्दयावरुन बऱ्याच स्टारकिड्सवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर नेपोटिझमला घेऊन आलिया भटला ही ट्रोल केले जाते आहे. 

आलिया भटचा सडक 2 हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याची नुकतीच घोषणा झाली आहे. सडक 2 ला ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज केले जाणार आहे. सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज झाले आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर सिनेमातील स्टारकाट्सला ट्रोल करण्याची सुरुवात झाली आहे. त्याचसोबत सिनेमाला #Boycott करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आलियाला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे आलियाने सोशल मीडियावरील तिचे कमेंट सेक्शन बंद केले आहे. आलिया आधी बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी त्यांचे कमेंट सेक्शन बंद केले आहे. 

सडक 2 चित्रपट महेश भट यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती मुकेश भटने केली आहे.सडक 2’ या चित्रपटात आलियाशिवाय आदित्य राय कपूर, संजय दत्त, पूजा भट असे अनेक कलाकार दमदार भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia bhatt mutes comments after got trolled on sadak 2 poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.