अभिनेत्री आलिया भट्ट... अगदी कमी वयातच जिने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. '2 स्टेट्स', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'उडता पंजाब', 'हायवे', 'डिअर जिंदगी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'राजी', 'गलीबॉय' सिनेमात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते.

 

तसेच सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींमध्येही आलियाचे नाव सामिल झाले आहे. २०२० हे वर्ष आलियासाठी खास ठरले कारण आलियाने वांद्रे येथे ३२ कोटींचे आलिशान घर खरेदी केले होते. तसेच तिच्याकडे अल्ट्रा लक्झरी वस्तू आहेत, ज्या त्याला खूप आवडतात.

एका मीडिया रिपोर्टनुसार आलियने खरेदी केलेला फ्लॅट पाली हिल कॉम्प्लेक्समधील पाचव्या मजल्यावर असून  2460 चौरस फूट इतका आहे.याच बिल्डींगमध्ये   रणबीर कपूर 7 व्या मजल्यावर राहतो. आलिया भट्टच्या घराचे इंडिरिअर गौरी खानने केले डिझाइन केले आहे.

आलिया भट्टकडे  बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. 'बीएमडब्ल्यू 7' सिरीज लक्झरी सेडान आहे. या कारची किंमत सुमारे 1.37 कोटी आहे. या व्यतिरिक्त लैंड रोवर रेंज रोवर वोग ज्याची किंमत 1.74 करोड आहे.  'ऑडी-ए 6' ही तिने खरेदी केलेली पहिली कार आहे.  2015 मध्ये तिने हा खरेदी केली होती.

इतकेच काय तर आलिया भट्टची व्हॅनिटी व्हॅनही खूप लक्झरियस आहे. शूटिंगवेळी बराचसा वेळ आलिया व्हॅनिटीमध्येच घालवतेय. तिच्या व्हॅनिटी व्हॅनचे डिझाइनही गौरी खाननेच केले आहे.नेहमीच आलिया तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


मुंबईव्यतिरिक्त लंडनमध्ये आलिया भट्टने घर खरेदी केले आहे.  2018 मध्ये तिने घर खरेदी केले होते. तिची बहीण या घरात राहते. आलियाच्या लंडनमधील घराची किंमत यूकेच्या रिअल इस्टेट वेबसाइटनुसार, 10.4 कोटी ते 31 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia Bhatt Has These Ultra Luxury Things Besides Of 32 Crore House In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.