alia bhatt clarifies rumors of injury on gangubai kathiawadi sets reveals the truth | आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण  

आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण  

ठळक मुद्देयेत्या दिवसात आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आलिया भट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवर जखमी झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहते काळजीत पडले. खरे तर ही बातमी आलियाच्या एका पोस्टमुळेच व्हायरल झाली होती. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मांजरीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ‘मम्मीसोबत सेल्फी टाईम. कारण पाठीला दुखापत झाली आहे. अशात रात्री दोन वाजता यापेक्षा चांगले करण्यासारखे काय आहे?,’ असे तिने या फोटोसोबत लिहिले होते. आलियाची ही पोस्ट वाचूनच ‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवर आलिया जखमी झाल्याचे वृत्त पसरले होते. पण या वृत्तामुळे आलिया चांगलीच खवळल्याचे दिसतेय.


होय, एक लांबलचक पोस्ट लिहून आलियाने याबद्दलचा संताप बोलून दाखवला आहे. मला ‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवर कुठलीही दुखापत झालेली नाही. हे वृत्त खोटे आहे. जुने दुखणे होते, त्यामुळेच मला त्रास होत होता. यापुढे माझ्यासोबत काय झाले, यावर रकानेच्या रकाने छापण्यापूर्वी कृपया माझ्याकडून एकदा कन्फर्म करण्याची तसदी घ्या.असल्या खोट्या बातम्या छापण्यापूर्वी माझ्याकडून कन्फर्म करा, असे रागारागात आलियाने लिहिले. गेल्या काही दिवसांपासून कामातून ब्रेक घेऊन आराम करत होते आणि आता पुन्हा कामावर परतत आहे. आजपासून ‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटींग सुरु करणार असल्याचेही तिने सांगितले.
  आलिया भट सध्या ‘गंगूबाई काठियावाडी’मुळे   चर्चेत आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे दोन पोस्टर्स नुकतेच रिलीज झाले आणि या पोस्टरनंतर आलियाच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.


येत्या दिवसात आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात आलिया पहिल्यांदा रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.

Web Title: alia bhatt clarifies rumors of injury on gangubai kathiawadi sets reveals the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.