Alia Bhatt became a huge troll on social media; Because you too will be amazed by reading !! | आलिया भट सोशल मीडियावर झाली जबरदस्त ट्रोल; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!

आलिया भट सोशल मीडियावर झाली जबरदस्त ट्रोल; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!

बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट ही सध्या चांगलीच ट्रोल होतेय. तुम्ही विचार करत असाल, नेपोटिझम मुळे? तर नाही. यावेळी ती एका वेगळयाच कारणामुळे ट्रोल होत आहे. ते म्हणजे कॅटचा टी-शर्ट कॉपी केल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल, यात काय आहे, एवढं ट्रोल होण्यासारखं ? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कॅटरिना कैफसारखाच टी-शर्ट घालून आलिया भट दिसली. त्यावर नेटिझन्स म्हणाले,‘आधी बॉयफ्रेंड आता टी-शर्ट किती कॉपी करतेस?’ यावर आता आलिया काय कमेंट करते, हे लवकरच कळेल.

कॅटरिना कैफ आणि आलिया भट या दोघी खुप चांगल्या मैत्रिणी आहेत. खरंतर बॉलिवूडचे सेलिब्रिटी एकमेकांची कायमच कॉपी करताना दिसतात. त्यांच्यासाठी कॉपी करणं काही फार मोठी गोष्ट नाही. पण, त्यांच्या कॉपी करण्याला नेटिझन्सनी जर साथ दिली तर ठीक नाहीतर ते चांगलेच फैलावर घेताना अनेकदा दिसतात. आता झालं असं की, आलिया भट जानेवारी २०२० मध्ये कॅटरिना कैफने घातलेल्या टी-शर्टप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या  टी-शर्टमध्ये दिसली होती. त्यावेळी आलिया सोनी राजदान सोबत दिसली होती. पांढऱ्या  रंगाच्या टीशर्टवर लाल रंगाच्या पट्टयांमध्ये ‘यू गो गर्ल’ असे लिहिलेले होते. यावेळी ती नो मेकअप लूकमध्ये दिसली होती. या ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. पण, जेव्हा युजर्सना लक्षात आले की, कॅटने देखील असाच सेम टीशर्ट घातला होता. तेव्हा मात्र त्यांनी ट्रोल करायला सुरू केले.

या फोटोला  व्हायरल करून वेगवेगळया कमेंट्स त्यांनी दिल्या. एकाने लिहिले की, आलिया ही कॅटरिनाची एवढी मोठी फॅन आहे की, तिने रिलेशनशिपपासून ते कपड्यांपर्यंत सगळंच कॉपी केलेलं दिसतेय.’ दुसऱ्याने लिहिले,‘कॅटरिनाची खरी फॅन.’ तर अजून एका युजरने लिहिले की, ‘आधी बॉयफ्रेंड कॉपी केला, आता टीशर्टही.’  आता यावर आलिया काय उत्तर देते, हे कळेलच लवकर...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia Bhatt became a huge troll on social media; Because you too will be amazed by reading !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.