ठळक मुद्देवर्कफ्रंट बाबत बोलायचे झाल्यास ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

काल 28 सप्टेंबरला रणबीर कपूरचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी ठेवली गेली. पहाटेपर्यंत चाललेल्या या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रणबीरची लेडी लव्ह आलिया भट आणि आई नीतू कपूर या दोघींनी मिळून ही पार्टी होस्ट केली. यादरम्यान आलियाने रणबीरला एक खास सरप्राईज दिले. या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, आलियाने रणबीरला स्वत: केलेला केक गिफ्ट दिला. तिने रणबीरचा आवडता पायनॅपल फ्लेवर्ड केक बनवला.


 बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी यांच्या अकाउंटवर पहिल्यांदा हा व्हिडिओ शेअर झाला आणि रणबीर आलियाच्या चाहत्यांनी तो व्हायरल केला. या व्हिडीओत आलिया किचनमध्ये केक करताना दिसतेय. विशेष म्हणजे, आलिया स्वत:च स्वत:च्या कुकिंग स्टाईलची टिंगल करतेय.


आलिया व रणबीर यांचे नाते आता जगजाहिर झाले आहे. कपूर आणि भट दोन्ही कुटुंबाने या नात्याला संमती दिल्याने लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार असे मानले जात आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आलियाने रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट  दिली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे कपल कित्येक कार्यक्रम, शोमध्ये एकत्रित दिसले. आता तर कपूर-भट कुटुंबीयांमध्येही चांगलीच जवळीक निर्माण झाली आहे. 


वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाल्यास ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.) या चित्रपटात रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जून मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: alia bhatt baked cake on ranbir kapoor birthday watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.