बॉलिवूडमध्ये 2020 मध्ये कोणतेही मोठे सिनेमा रिलीज झाले नाहीत, तयार सिनेमांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. बरेच कलाकार आर्थिक पेचात सापडले. पण बॉलिवूड अभिनेत्रींनी याचा सामना करावा लागला नाही, कारण 2019 आणि 2020 मध्ये त्यांनी जाहिरातींव्दारे कमाई केली. 


अभिनेत्री आलिया भट लॉकडाऊनमध्ये रिलॅक्स मूडमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसली. आलिया भटने 2019 मध्ये 59.12 कोटींची कमाई केली. तिने गल्ली बॉय सारखा सुपरहिट सिनेमा दिला. या सिनेमा ती रणवीर सिंगच्या अपोझिट होती. एवढेच नव्हे तर गल्ली बॉयसाठी तिला  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

जाहिरातींमधून कमाई 
यानंतर करण जौहरच्या बहुप्रतिक्षित  'कलंक' सिनेमामध्ये आलिया वरुण धवनसोबत झळकली होती. या चित्रपटासाठी तिला चांगलेच मानधन मिळाले.  इतकेच नव्हे तर आलियाने याच काळात लेज, फ्रूट्टी आणि फ्लिपकार्टच्या जाहिरातीही शूट केल्या ज्यामुळे तिचे उत्पन्न लक्षणीय वाढले.

आगामी सिनेमा 
आलिया ही लहान वयात सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. सध्या ती ब्रह्मास्त्र आणि गंगूबाई काठियावाड चित्रपटाची तयारी करते आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमा ती बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरच्या सोबत दिसणार आहे. यात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अयान मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia bhatt annual income from movies and add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.