ठळक मुद्देऋषी कपूर यांची तब्येत आता सुधारत असून २० डिसेंबर २०२० पासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या समारंभाना सुरुवात होणार आहे. चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. २०२० मध्ये आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. त्या दोघांची मुख्य भूमिका असलेला ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. आलिया आणि रणबीर डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान करत असल्याची चर्चा रंगली होती. पण आता ते दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच त्या दोघांचे लग्न होणार आहे.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषी कपूर यांची तब्येत आता सुधारत असून २० डिसेंबर २०२० पासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या समारंभाना सुरुवात होणार आहे. चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. पण सध्याची देशातील स्थिती पाहाता तारखेत काही बदल होऊ शकतात. अतिशय धुमधडाक्यात मुंबईत आलिया आणि रणबीरचे लग्न होणार आहे.

ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी आलिया आणि रणबीर यांच्या नात्याला सुरुवात झाली असे म्हटले जाते. त्या दोघांना गेल्या अनेक महिन्यांपासून विविध सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र पाहाण्यात येते. तसेच रणबीरच्या कुटुंबासोबत देखील आलिया अनेकवेळा दिसते. त्यामुळे आलिया आणि रणबीर यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबियांनी देखील होकार दिला असून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली आहे.

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने प्रत्येकजण आपापल्या घरात राहात आहेत. नुकतेच आलिया आणि रणबीरला त्यांच्या कुत्र्यासोबत त्यांच्या बिल्डिंगच्याखाली पाहाण्यात आले. दोघे एकमेकांसोबत खूपच खूश दिसत होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alia Bhatt and Ranbir Kapoor set to tie the knot in December 2020 in Mumbai? PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.