ठळक मुद्देरणधीर कपूर यांच्या बर्थ डे पार्टीला रणबीर कपूर,  आलिया भट, करिना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, संजय कपूर, आदर जैन, तारा सुतारिया, बबीता कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर सगळे एकत्र दिसले. 

रणबीर कपूरआलिया भट सध्या जबरदस्त ट्रोल होत आहेत. कारण काय तर त्यांचा एक व्हिडीओ. होय, या व्हिडीओत रणबीर व आलिया हे दोघे रात्री 1 वाजात पार्टी अटेंड करून बाहेर पडत आहेत. ही पार्टी दुस-या कोणाची नाही तर रणबीरचे मोठे वडील रणधीर कपूर यांची बर्थ पार्टी होती. रणधीर कपूर आज त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काल रात्री 12 वाजता संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आले. रणबीर व त्याची गर्लफ्रेन्ड आलिया हे दोघेही या पार्टीला हजर होते. रणधीर कपूर यांचा लहान भाऊ राजीव कपूर यांचे 5 दिवसांआधीच निधन झाले असताना कपूर कुटुंबात बर्थ डे साजरा होतो, नेमकी हीच गोष्ट लोकांच्या पचनी पडली नाही. मग काय, लोक सगळ्यांनाच ट्रोल करत आहेत.

कमीत कमी 12 दिवस तर थांबायचे, काकाचे निधन झाले आणि पार्टी सुरु अशा शब्दांत लोकांनी कपूर कुटुंबाला ट्रोल केले. विशेषत: रणबीर कपूरला लोकांनी जाम फैलावर घेतले. रणबीरसोबत आलियाही गोवली गेली. किती स्वार्थी आणि निर्दयी आहेत हे लोक अशा काय काय प्रतिक्रिया नेटक-यांनी दिल्यात.

रणधीर कपूर यांच्या बर्थ डे पार्टीला रणबीर कपूर,  आलिया भट, करिना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, संजय कपूर, आदर जैन, तारा सुतारिया, बबीता कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर सगळे एकत्र दिसले. 


 13  फेब्रुवारीला राजीव कपूर यांचा ‘चौथा’ आयोजित केला गेला होता. यावेळी कपूर कुटुंबासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते. 9  फेब्रुवारीला  अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे  हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांचे राजीव सर्वात धाकटे बंधू होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: alia bhatt and ranbir kapoor celebrated randhir kapoor birthday left post 1 am last night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.