ठळक मुद्देनिर्मात्या स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आणि अलाया यांच्यात खूप चांगली मैत्री असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात आले आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिडसची सर्वात जास्त चर्चा आहे. यातच आणखीन एका स्टारकिडसची भर पडली आहे. अभिनेत्री पूजा बेदीची लेक अलाया फर्निचरवालाने नुकतीच बॉलिवूडमध्ये 'जवानी जानेमन' या चित्रपटाद्वारे एंट्री घेतली आहे. या चित्रपटातील अलायाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट पाहाताना आलियाचा हा डेब्यू चित्रपट असल्याची जाणीव देखील होत नसल्याचे अनेकांनी या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये म्हटले होते. 

अलायाला पहिल्याच चित्रपटामुले चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पोस्ट करत असते. अलाया आता तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

निर्मात्या स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आणि अलाया यांच्यात खूप चांगली मैत्री असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात आले आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, अलाया आणि ऐश्वर्य यांची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या दोन वर्षांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अलायाच्या जवानी जानेमन या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला देखील ऐश्वर्यने आवर्जून उपस्थिती लावली होती.  तसेच अनेकवेळा अलाया देखील त्याच्या घरी जात असल्याचे म्हटले जाते.

जवानी जानेमन या चित्रपटात अलायाने सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकरली होती. या चित्रपटात तिचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. आता प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात अलायाच्या आईच्या भूमिकेत आपल्याला प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूला पाहायला मिळाले होते. 

Web Title: alaya furniturewala has special friendship with smita thackeray son aishwarya thackeray PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.