अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. आता या सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर दिली होती. अक्षय कुमारने अतरंगी रेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अक्षय कुमारने आग्रातील ताज महलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, वाह ताज! अक्षय कुमारच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

'अतरंगी रे' यापूर्वी १४ फेब्रुवारी २०२१ रोजी व्हॅलेंटाईन डेनिमित्त रिलीज करण्याचा प्लान होता. परंतु कोरोनमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही. सिनेमाच्या निर्मात्यांनी त्याची पुढील रिलीज तारीख जाहीर केलेली नाही. या सिनेमाला ए.आर. रहमान संगीत देणार आहे. सारा अली खान, अक्षय कुमार व धनुष यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं कमालीचं ठरणार आहे.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अक्षय कुमारचा नुकताच लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘लक्ष्मी’ हा सिनेमा भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. वर्ल्डवाईड प्रदर्शित होणारा मार्च २०२० नंतरचा अक्षयचा हा पहिला सिनेमा आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. अक्षयने आसिफ ही भूमिका साकारली आहे. तर कियाराने प्रिया ही व्यक्तीरेखा वठविली आहे. लक्ष्मी हा साऊथच्या ‘कंचना’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay Kumar's video on the set of 'Atarangi Re' has come out, the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.