PICS : अक्षयवर कोसळला दु:खाचा डोंगर, डबडबलेल्या डोळ्यांनी आईला दिला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 02:02 PM2021-09-08T14:02:45+5:302021-09-08T14:03:48+5:30

Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral: अक्षय कुमार पत्नी ट्विंकलसोबत आईच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाला, त्यावेळी आई गमावल्याचं दु:ख त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसलं.

Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral: Wife Twinkle Khanna and daughter Nitara attended | PICS : अक्षयवर कोसळला दु:खाचा डोंगर, डबडबलेल्या डोळ्यांनी आईला दिला अखेरचा निरोप

PICS : अक्षयवर कोसळला दु:खाचा डोंगर, डबडबलेल्या डोळ्यांनी आईला दिला अखेरचा निरोप

Next
ठळक मुद्देबॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही अंत्यसंस्कारासाठी पोहोचले. निर्माता रमेश तोराणी, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता रितेश देशमुख, अक्षयचा जवळचा मित्र दिग्दर्शक साजिद खान यावेळी उपस्थित होते.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kuma) याची आई अरूणा भाटिया (Aruna Bhatia) यांचे आज सकाळी निधन झाले. खुद्द अक्षयने ट्वीट करून ही माहिती दिली.
अरूणा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईच्या हिरानंदानी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. मुंबईच्या पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय कुमार पत्नी ट्विंकलसोबत आईच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाला. (Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral)  त्यावेळी आई गमावल्याचं दु:ख त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसलं. उद्या अक्षयचा वाढदिवस आहे. त्याआधीच आज आई जग सोडून गेली. 

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही अंत्यसंस्कारासाठी पोहोचले. निर्माता रमेश तोराणी, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता रितेश देशमुख, अक्षयचा जवळचा मित्र दिग्दर्शक साजिद खान यावेळी उपस्थित होते.

आईची प्रकृती गंभीर आहे हे कळताच अक्षय सोमवारी सकाळी ब्रिटनहून मुंबईला परतला होता. शूटींग अर्धवट सोडून तो आईला भेटायला पोहोचला होता.

माझ्या आईसाठी प्रार्थना करा, अशी भावुक पोस्टही त्याने शेअर केली होती.  तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे, अशी पोस्ट त्याने केली होती. मात्र आज सकाळी आईच्या निधनाची बातमीच त्याला मिळाली. 

सोशल मीडियावर त्याने चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती. ‘ती माझा आधार होती आणि आज मला असह्य दु:ख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुस-या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. या दु:खप्रसंगी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती,’ अशा शब्दात अक्षयने आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली.
 

Web Title: Akshay Kumar’s mother Aruna Bhatia’s funeral: Wife Twinkle Khanna and daughter Nitara attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app