akshay kumar wife twinkle khanna condition for second child-ram | दुस-या अपत्यासाठी ट्विंकल खन्नाने अक्षय समोर ठेवली होती ही अट, ऐकून हैराण झाला होता अक्की 

दुस-या अपत्यासाठी ट्विंकल खन्नाने अक्षय समोर ठेवली होती ही अट, ऐकून हैराण झाला होता अक्की 

ठळक मुद्देट्विंकलने केवळ 15 दिवसांसाठी अक्षयला बॉयफ्रेंड बनवले होते. पण या 15 दिवसांत दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आलेत की दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. 

तशा बॉलिवूडमध्ये अनेक क्यूट जोड्या आहेत. पण अक्षय कुमारट्विंकल खन्नाची बातच न्यारी. एकीकडे अक्षय कुमार बॉलिवूडचा सुपरस्टार आहे तर दुसरीकडे ट्विंकल खन्ना निर्माता व लेखिका आहे. अक्षय व ट्विंकलला आरव व नितारा अशी दोन मुलं आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण आरवचा जन्मानंतर दुस-या अपत्यासाठी ट्विंकलने अक्षयसमोर एक अट ठेवली होती, हे तुम्हाला माहित आहे का? हो, ट्विंकलची ही अट ऐकून अक्षयही हैराण झाला होता.
खुद्द ट्विंकलने ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये याचा खुलासा केला होता. या चॅट शोमध्ये अक्षय-ट्विंकल दोघेही सहभागी झाले होते.. याचवेळी ट्विंकलने हा धमाकेदार खुलासा केला होता. दुस-या अपत्याच्या जन्माआधी मी अक्षयसमोर एक अट ठेवली होती, असे सांगून तिने धम्माल उडवली होती.

काय म्हणाली होती ट्विंकल
आरवच्या जन्मानंतर काही वर्षांनी अक्षयला दुसरे अपत्य हवे होते. पण मी मात्र हा निर्णय घेण्याआधी अक्षयसमोर एक अट ठेवली होती. जोपर्यंत तू चांगले व सेन्सिबल सिनेमे करत नाहीस तोपर्यंत मी दुस-या बाळाचा विचार करणार नाही, असे मी स्पष्टपणे अक्षयला सांगितले होते. माझी अट ऐकून अक्षय हैराण झाला होता. पण मी ठाम होते, असे ट्विंकलने सांगितले होते. ट्विंकलचे ते शब्द ऐकून करण जोहरही अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिला होता.

लग्नासाठीही आईने ठेवली होती अट

ट्विंकलने केवळ 15 दिवसांसाठी अक्षयला बॉयफ्रेंड बनवले होते. पण या 15 दिवसांत दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आलेत की दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. यानंतर ट्विंकलला लग्नाची मागणी घालण्यासाठी अक्षय डिंपल कपाडिया यांना भेटायला गेला आणि डिंपल यांनी एक वेगळीच अट ठेवली. होय, एक वर्षे लिव्ह इनमध्ये राहा़ यानंतरच लग्नाचा निर्णय घेतला जाईल, अशी ती अट होती. फायनली वर्षभरानंतर अक्षय व ट्विंकल यांचे लग्न झाले़ होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: akshay kumar wife twinkle khanna condition for second child-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.