दाम करी काम हे आपण वारंवार ऐकलंय... म्हणूनच की काय कामासाठी मिळणारी फी वाढवण्याचा निर्णय खिलाडी अक्कीनं घेतला. 'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही.

प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.  कारण अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून  प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो. 

आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी २७ कोटी मानधन घेत असे.. मात्र वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता अक्षय कुमार पुन्हा त्याच्या कमाईमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने फक्त दोन दिवसांच्या शूटिंगसाठी तब्बल २७ कोटी रूपये मानधन घेतले आहे. 'अतरंगी रे' या सिनेमात अभिनेत्री सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद एल रॉय सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे  अक्षय सिनेमात  पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

यापूर्वही शौकिन सिनेमाच्या रिमेकसाठी खिलाडी अक्कीला अवघ्या 20 दिवसांसाठी  45 कोटी मानधन मिळाले होते.. एक्टिंग असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही... मग काय कामासाठी मिळणा-या अशाप्रकारच्या फीमुळे खिलाडीला नवी एनर्जी मिळते.

अक्षयचे 'बेल बॉटम', 'अतरंगी रे', 'लक्ष्मी बॉम्ब' हे सिनेमे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या अक्षय 'अतरंगी रे'चं सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या सिनेमाच्या दोन आठवड्यांच्या चित्रीकरणासाठी त्यानं तगडं मानधन घेतल्यामुळे त्याने सिनेमासाठी मानधन वाढवले असणार अशी चर्चा आहे. 

विशेष म्हणजे अक्षय कुमार कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो. आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay Kumar Takes Huge Amount For Film Atrangi Ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.