अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. आता या सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती अक्षय कुमारने सोशल मीडियावर दिली आहे. सारा अली खानबरोबर त्याने एक फोटो शेअर केले आहे.
सारासोबत त्याचा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले की, या तीन शब्दातून मिळणार आनंद काही औरच आहे. लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन. आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.. आपल्याला फक्त प्रेम आणि शुभेच्छांची आवश्यक आहेत.
पहिल्यांदा, अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. धनुषबद्दल सांगायचे झाले तर त्याने आनंद एल राय यांच्या सुपरहिट सिनेमा 'रांझणा'मध्ये त्याने काम केले आहे ज्यात त्याच्यामध्ये सोनम कपूर, स्वरा भास्कर, मोहम्मद झीशान अय्यूब आणि अभय देओल यांच्यासारखे कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.
'अतरंगी रे' यापूर्वी 14 फेब्रुवारी 2021 रोजी व्हॅलेंटाईन डेनिमित्त रिलीज करण्याचा प्लान होता. परंतु कोरोनमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही. सिनेमाच्या निर्मात्यांनी त्याची पुढील रिलीज तारीख जाहीर केलेली नाही. या सिनेमाला ए.आर. रहमान संगीत देणार आहे. सारा अली खान, अक्षय कुमार व धनुष यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं कमालीचं ठरणार आहे.
वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Akshay kumar kick starts shooting of atrangi re shares picture with sara ali khan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.