ठळक मुद्देतान्हाजीः द अनसंग वॉरियर हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केला आहे. केवळ हाच चित्रपट नव्हे तर छपाक देखील ऑनलाईन लीक झाला आहे.

तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ही कथा आपण शालेय जीवनापासून वाचत आलो आहोत. हीच कथा अतिशय भव्यरित्या तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाला समीक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली आहे. पण आता तान्हाजीः द अनसंग वॉरियर हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. तामीळ रॉकर्सने हा चित्रपट लीक केला आहे. केवळ हाच चित्रपट नव्हे तर छपाक देखील ऑनलाईन लीक झाला आहे.

तामीळ रॉकर्सने पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाइक लीक करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील मरजावाँ, ड्रीम गर्स, भारत, कबीर सिंह, केसरी यांसारखे चित्रपट देखील ऑनलाईन लीक झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले होते.

'तान्हाजी' प्रदर्शित होताच या सिनेमाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले. या सिनेमाने 16 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेच दिसतंय. दमदार ॲक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या सिनेमाला 4540 स्क्रिन्स मिळाले होते.

Web Title: Ajay Devgn's Tanhaji full movie leaked online by Tamilrockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.