Ajay Devgan's Son Yug Devgan's Weird Behavior Ifront Of Media | अजय देवगणचा मुलगा मीडियाचे कॅमेरे पाहाताच करतो अशा गोष्टी, पाहून तुम्हीही व्हाल शॉक

अजय देवगणचा मुलगा मीडियाचे कॅमेरे पाहाताच करतो अशा गोष्टी, पाहून तुम्हीही व्हाल शॉक

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. स्टारकिड्सच्या यादीत आघाडीवर आहे करीनाचा लेक तैमूर अली खान. तो तर माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आता गेल्या काही दिवसांपासून आणखीन स्टारकिड्स आहेत जे सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे अजय- काजोलची मुलं. 


मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी दोन मुले यांना आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात. आता युगही सा-यांचे लक्ष वेधून घेतो आहे. मात्र युगला जास्त लाइमलाइटमध्ये राहणे आवडत नाही. त्यामुळे मीडियाचे कॅमेरे बघताच तो अशा प्रकारे हावभाव देत फोटो काढण्यास मनाई करत असतो. अनेकदा त्याचे असे वागणे बघून आई काजोलही त्याला अशा गोष्टी करण्यास रोखत असते. मात्र तो आईचेही ऐकत नाही. 


अजयने नुकतीच एका वेबसाईटला मुलाखत दिली असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्याचा मुलगा युगबाबत एक खास गोष्ट सांगितली आहे. अजय हा खूप चांगला अभिनेता असला तरी तो चांगला डान्सर नाहीये हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तो त्याच्या कमी चित्रपटांमध्ये आपल्याला डान्स करताना दिसतो. अजयच्या या नृत्य कौशल्यावरून त्याचा मुलगा युग देखील त्याची टर खेचतो. युग मला नेहमीच सांगतो की, तुम्ही डान्स करू नका ही गोष्ट अजयनेच स्वतः सांगितली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajay Devgan's Son Yug Devgan's Weird Behavior Ifront Of Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.