ठळक मुद्देअजयचा मुलगा युग त्याचे चित्रपट पाहातो का असे विचारले असता अजयने सांगितले, युग हा आठ वर्षांचा असला तरी आजकालच्या मुलांना लहान वयातच मिळत असलेल्या एक्सपोजरमुळे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांची मतं पक्की असतात. युग नेहमीच सांगतो की, तुम्ही डान्स करू नका.

अजय देवगण हा आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अजयचे लग्न अभिनेत्री काजोल सोबत झाले असून त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. अजयने नुकतीच एका वेबसाईटला मुलाखत दिली असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्याचा मुलगा युगबाबत एक खास गोष्ट सांगितली आहे.

अजय हा खूप चांगला अभिनेता असला तरी तो चांगला डान्सर नाहीये हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तो त्याच्या कमी चित्रपटांमध्ये आपल्याला डान्स करताना दिसतो. अजय डान्स करत असला की, हा असा का नाचतोय अशी पहिली प्रतिक्रिया नेहमीच आपली असते. पण तुम्हाला माहीत आहे का, अजयच्या या नृत्य कौशल्यावरून त्याचा मुलगा युग देखील त्याची टर खेचतो. ही गोष्ट अजयनेच स्वतः सांगितली आहे.

लाइव्ह हिंदुस्थान या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत युगचे अजयच्या डान्सबाबत काय मत आहे याबद्दल अजयने सांगितले आहे. अजयचा मुलगा युग त्याचे चित्रपट पाहातो का असे विचारले असता अजयने सांगितले, युग हा आठ वर्षांचा असला तरी आजकालच्या मुलांना लहान वयातच मिळत असलेल्या एक्सपोजरमुळे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्यांची मतं पक्की असतात. युग मला नेहमीच सांगतो की, तुम्ही डान्स करू नका...

अजय देवगण लवकरच दे दे प्यार दे या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन तो करत आहे. या चित्रपटात अजय सोबतच तब्बू आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबतच जिमी शेरगिल आणि आलोकनाथ देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अजय या चित्रपटात ५० वर्षाच्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आहे. एका २६ वर्षांच्या मुलीसोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तब्बू त्याच्या पूर्वपत्नीची तर रकुल त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Ajay Devgan son yug feels Ajay is not good dancer, advise him not to dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.