हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. लेकीसाठी करियरला काही काळापुरता अल्पविराम देऊन बच्चन बहू ऐश्वर्यानं बॉलीवुडची सुपरमॉम असल्याचं दाखवून दिलंय.


ऐश्वर्या आज 4 वर्षांपूर्वी आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. असं म्हणतात की या फोटोशूटमुळे ऐश्वर्याचं  संसारिक  आयुष्यातही वादळ आले होते. बच्चन कुटुंबीयही या फोटोशूटवरून खूप नाराजी व्यक्त केली होती. 2015 मध्ये जेव्हा ऐश्वर्या रायने करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात ऐश्वर्याने 9 वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन दिले होते.

 

‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक फोटोशूटही करण्यात आले होते. त्यात ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत अनेक बोल्ड पोज दिल्या होत्या. आचर्य चकित करणारी गोष्ट अशी की आई बनल्यानंतर जवळजवळ चार वर्षांनंतर झालेल्या या फोटोशूटमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस अवतार पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते.


स्क्रिप्ट अधिक बोल्ड असायला हवी ही मागणी अ‍ॅशने त्यावेळी केली होती.वास्तविक, यापूर्वी ‘धूम 2’ चित्रपटात ऐश्वर्याने हृतिक रोशनबरोबर असेच सीन दिले होते, ज्यावर अमिताभ-जया यांनीही आक्षेप घेतला होता. मात्र, हा चित्रपट ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नापूर्वी रिलीज करण्यात आला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya Rai Ranbir Kapoor Hot Sex Scene, Amitabh Bachchan ANGRY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.