ठळक मुद्देऐश्वर्या लवकरच मणिरत्नम यांच्या  Ponniyin Selvan या चित्रपटात दिसणार आहे.

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने डेब्यू केला. या फॅशन वीकमध्ये  ऐशने परिधान केलेल्या खास ड्रेसमुळे  प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अनेकांनी रॅम्पवरील तिच्या लूकची प्रशंसा केली. अपवाद फक्त एक. तो म्हणजे, डिझाईनर वेंडल रॉड्रिक्स. होय, वेंडलला ऐश्वर्याचा रॅम्पवरील लूक अजिबात आवडला नाही. तिचा लूक पाहून तो इतका नाराज झाला की, आपल्या सोशल अकाऊंटवर त्याने ही नाराजी बोलून दाखवली.


‘लॉरियाल, तुमच्याकडे जगातील सर्वात सुंदर महिला आहे आणि तुम्ही तिचे असे मेकअप केले? तिच्या अंगावर असा ड्रेस चढवला? हा ड्रेस डिझाईन करणा-या स्टाइलिस्टला आत्ताच्या आत्ता हाकला आणि त्याला सांगा की हॅलोविन पुढच्या महिन्यात आहे,’ अशी पोस्ट वेंडलने लिहिली.


तुम्हाला माहित आहेच की, ऐश्वर्या लॉरियाल कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. याच ब्रँडला प्रमोट करण्यासाठी तिने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी तिने इटालियन डिझायनर गिएमबटिस्टा वल्लीने डिझाईन केलेला पर्पल कलरचा आउटफिट परिधान केला होता.  या ड्रेसला एक लांब ट्रेल होती.  व्हाइट रफल्ड फर शुज तिच्या लुकला पूर्ण करत होते. पर्पल कलरचे ग्लिटर आयशॅडो आणि शायनिंग रेड लिपस्टिक अशा तिचा लूक होता. हाय नेक आणि फुल स्लीव्सचा हा पर्पल ड्रेस वेंडरला आवडला नाही. ऐश्वर्याचा मेकअपही त्याला आवडला नाही.


ऐश्वर्या लवकरच मणिरत्नम यांच्या  Ponniyin Selvan या चित्रपटात दिसणार आहे. यात ती आई आणि मुलगी अशा डबलरोलमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अनिल कपूर-राजकुमार राव स्टारर ‘फन्ने खां’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. पण हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aishwarya rai bachchans paris fashion week look designer slams says sack the stylist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.