Aishwarya Rai Bachchan was pregnant during the shooting and lost the movie | करीना कपूरने प्रेग्नेंसीत केलं होतं शूटिंग, मात्र ऐश्वर्या राय बच्चनला प्रेग्नेंट राहिल्यामुळे गमवावा लागला होता सिनेमा

करीना कपूरने प्रेग्नेंसीत केलं होतं शूटिंग, मात्र ऐश्वर्या राय बच्चनला प्रेग्नेंट राहिल्यामुळे गमवावा लागला होता सिनेमा

बॉलिवूडमधील  पडद्यामागील किस्से आणि रहस्ये आहेत ज्यांची माहिती फारच कमी लोकांना असते. आपल्याला माहिती आहे काय की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही बॉलिवूड अभिनेत्री प्रेग्नेंट झाल्या आहेत. या अभिनेत्रींनी प्रेग्रेंंन्सीमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिचं लग्न आणि प्रेग्नन्सीला घेऊन बरीच चर्चेत आली होती. ऐश्वर्या हिरोईन सिनेमाच्या दरम्या प्रेग्नेंट झाली होती. यामुळे तिला हा सिनेमा मध्येच सोडावा लागला होता. या चित्रपटाच्या काही सीन्स ऐश्वर्याने शूट केले होते. यानंतर करीनाने ऐश्वर्याऐवजी चित्रपटात भूमिका साकारली होती. 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील पती-पत्नीची सर्वात सुंदर जोडी आहे. दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर बघणं प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब असते. आतापर्यं दोघांनी ८ सिनेमात एकत्र काम केलंय. आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'गुलाब जामुन' आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग कश्यप. अभिषेक-ऐश्वर्याने याआधी 'कुछ ना कहो', 'गुरु', 'उमराव जान', 'धूम 2', 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण', 'हॅप्पी एनिवर्सरी', 'सरकार राज' सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya Rai Bachchan was pregnant during the shooting and lost the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.