अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील मोस्ट हॅपनिंग कपल पैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला  जवळपास 13 वर्षे झाली आहेत. ऐश्वर्याच्या आधी अभिषेकच्या आयुष्यात करिश्मा कपूर होती. दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतं होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता.

मात्र काही दिवसांनी दोघांनी आपलं रस्ते वगळे केले. करिश्मा कपूरशी साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात दीपनिता शर्मा या मॉडेल- अभिनेत्रीची एंट्री झाली होती. असंभव, कोई आप सा सारख्या सिनेमात दीपनिताने काम केले आहे. दोघांनी ओळख सोनाली बेंद्रेने करुन दिली होती.

रिपोर्टनुसार दीपनिता आणि अभिषेक एकमेकांना 10 महिने डेट करत होते. अभिषेक दीपनिताच्या प्रेमात वेडा झाला होता. अभिषेकने दीपनितासोबतचे रिलेशनशीप मीडियापासून नेहमीच लपवून ठेवले. दीपनिताने अभिषेकच्या बर्थ डे निमित्त पार्टी ठेवत होती, मात्र अभिषेकने त्या पार्टीत येण्यास नकार दिला. कारण त्याचवेळी अभिषेक ऐश्वर्या रायकडे आकर्षित होत होता. त्यानंतर अभिषेकने दीपनिताला इग्नोर करायला सुरुवात केली आणि दोघांचे ब्रेकअप झाले. 


गुरुच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी सुरु झाली. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले होते. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेच स्वीकारले आणि  2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.  

Web Title: Before aishwarya rai abhishek bachchan dating model dipannita sharma gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.