ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आता ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जया बच्चन यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटीव्ह आला आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे जाहीर केले आहे.

अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर  ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांची  कोरोना चाचणी झाली होती. आधी ऐश्वर्या व आराध्याची प्राथमिक  कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण दुपारी फायनल रिपोर्टमध्ये ऐश्वर्या व आराध्या दोघीही कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: ट्विट करत ऐश्वर्या व आराध्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली होती. मात्र काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. पण तोपर्यंत त्यांचे ट्विट व्हायरल झाले होते. 

शनिवारी रात्री उशिरा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya Rai, Aaradhya test positive for coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.