सुशांत सिंह राजपूतला मिळणार होता 'हा' सिनेमा, आता आयुष्मान साकारत आहे मुख्य भूमिका

By अमित इंगोले | Published: October 27, 2020 03:55 PM2020-10-27T15:55:23+5:302020-10-27T15:58:09+5:30

दिग्दर्शक अभिषेक कपूरने काही दिवसांपूर्वी आगामी 'चंडीगढ करे आशिकी' सिनेमाचं शूटींग सुरू केलं. ज्यात आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे.

Ahishek Kapoor wanted to caste Sushant Singh Rajput in Chandigarh kare aashiqui now Ayushmann Khurrana is playing the lead role | सुशांत सिंह राजपूतला मिळणार होता 'हा' सिनेमा, आता आयुष्मान साकारत आहे मुख्य भूमिका

सुशांत सिंह राजपूतला मिळणार होता 'हा' सिनेमा, आता आयुष्मान साकारत आहे मुख्य भूमिका

Next

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. अनेक अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, सुशांत सिंह राजपूतच्या हातून अनेक मोठे सिनेमे निघून गेलेत. आता अजून एक सिनेमा समोर आलाय जो आधी सुशांतला ऑफर झाला होता. पण आता या सिनेमात मुख्य भूमिकेत आयुष्मान खुराणा दिसणार आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरने काही दिवसांपूर्वी आगामी 'चंडीगढ करे आशिकी' सिनेमाचं शूटींग सुरू केलं. ज्यात आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक कपूरने हा सिनेमा आधी सुशांत सिंह राजपूतला ऑफर केला होता. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, अभिषेक कपूरने सुशांतसोबत 'केदारनाथ' केल्यावर लगेच या सिनेमाबाबत चर्चा केली होती. सुशांत आणि वाणीची जोडी अभिषेकची पहिली पसंत होती. पण हा सिनेमा करण्याआधीच तो या जगातून गेला.

दरम्यान, अभिषेक कपूर यानेच 'काय पो छे'मधून सुशांत सिंह राजपूतला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. त्यानंतर अभिषेकने सुशांतला 'फितूर'सिनेमाचीही ऑफर केली होती. पण सुशांतने हा सिनेमा नाकारला होता. यानंतर या सिनेमात आदित्य रॉय कपूरला घेण्यात आलं होतं. यानंतर अभिषेक आणि सुशांत केदारनाथच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले होते.

असो, सुशांत भलेही या जगात नसला पण आयुष्मान खुराणाकडून तर अपेक्षा ठेवूच शकतो की, तो या सिनेमातील अॅथलीटच्या भूमिकेसोबत नक्कीच न्याय करेल. यासाठी आयुष्मानने फिटनेस आणि बॉडीसाठी मोठी मेहनत घेतली आहे. या सिनेमाची कथा चंडीगढमध्ये घडणार आहे आणि आयुष्मान मुळचा चंडीगढचा आहे त्यामुळे याचाही प्रभाव सिनेमात बघायला मिळेल.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ahishek Kapoor wanted to caste Sushant Singh Rajput in Chandigarh kare aashiqui now Ayushmann Khurrana is playing the lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app